नाशिक: सफरचंद खरेदी व्यवहारात व्यापाऱ्याला ३८ लाखांना गंडा

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या फळ व्यापाऱ्याला सफरचंद खरेदी व्यवहारात तब्बल ३८ लाखांना गंडा घातल्याचं प्रकरण समोर आलं आहे.. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रारंभी काही रकमेची परत फेड करीत संशयितांनी उर्वरीत रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: पोलिस असल्याची बतावणी करत वृद्धेचे ३.७० लाखांचे दागिने लांबवले

शाहिद इनामदार व आझीझ इनामदार (रा.दोघे सह्याद्री हॉस्पिटलसमोर मिरजकरनगर,वडाळारोड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत विशाल विनायक डोईजड (रा.गजपंथ,म्हसरूळ) या फळ व्यापाऱ्याने फिर्याद दिली आहे. डोईजड हे फळ व्यापारी आहेत. शरद पवार मार्केट मधील गाळा नं.६ मधून हा व्यवसाय ते करतात.

👉 हे ही वाचा:  नाशिकच्या साल्हेरसह १२ किल्ले 'युनेस्को'च्या जागतिक वारसा स्थळ यादीत !

गेल्या वर्षी १२ ऑगष्ट ते डिसेंबर २०२३ दरम्यान त्यांनी संशयितांच्या लिझीझी इम्पोर्ट एक्स्पोर्ट या कंपनीला सिमला अ‍ॅपलचा वेळोवेळी पुरवठा केला होता. प्रारंभी संशयितांनी चोख व्यवहार दाखवून ही फसवणुक केली.

पाच महिन्यांच्या कालावधीत संशयितांना ७३ लाख १६ हजार १९८ रूपये किमतीचे सफरचंदचा पुरवठा करण्यात आला. यापोटी संशयितांनी ३५ लाख ५० हजाराची परत फेड केली मात्र उर्वरीत ३७ लाख ६६ हजार १९८ रूपये देण्यास टाळाटाळ केली. सहा महिने उलटूनही संशयितांनी उधारीची परतफेड न केल्याने व्यापारी डोईजड यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत. (पंचवटी पोलीस ठाणे, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३८१/२०२४)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790