नाशिक: शहरात घरफोड्यांचे सत्र; 4 घटनांमध्ये 7 लाखांचा ऐवज चोरीला

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): शहर पोलिसांनी हायप्रोफाईल घरफोडीची उकल केल्यानंतरही शहरातील घरफोड्यांचे सत्र थांबलेले नाही. शहरात आणखी चार घरफोड्या झाल्या असून, सुमारे सव्वा सात लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे.

यात दोन घरफोड्या या इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतच घडल्या आहेत. यामुळे शहर पोलिसांसमोर घरफोड्यांचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

अशोका मार्ग परिसरातील कल्पतरु नगरमधील बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी चांदीचे दागिने व रोकड असा ३ लाख २३ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरून नेत घरफोडी केली.

हे ही वाचा:  नाशिक: 1 ,2 व 3 बीएचके या पारंपरिक फ्लॅट्ससोबतच ग्राहकांचा कल 4-5 बीएचके, स्टुडिओ अपार्टमेंटकडे...

अरुण लक्ष्मण कपिले (रा. प्रल्हाद आर्केड, कल्पतरु नगर) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या शुक्रवारी (ता.५) भरदिवसा दुपारी दीडच्या सुमारास सदरची घरफोडी झाली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर, इंदिरानगर परिसरामध्ये दोन घरफोड्या झाल्या आहेत. राजीव नगर परिसरातील बंद बंगल्याचा कडीकोयंडा तोडून चोरट्याने घरातून १ लाख ७२ हजारांचे सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेत घरफोडी केली.

रमेश नारायण येवले (रा. स्नेहल बंगला, राजीवनगर) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचा बंगला ३० डिसेंबर ते ४ जानेवारी या दरम्यान बंद असताना अज्ञात चोरट्याने घरफोडी केली.

हे ही वाचा:  महत्वाची बातमी: नाशिक: शहरातील या महत्वाच्या भागांत आज वाहतुकीस 'नो एंट्री' !

तर, इंदिरानगर परिसरातील आयटीआय कॉलनीसमोर असलेल्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी भरदिवसा ७६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेत दुसरी घरफोडी केली.

मिलिंद प्रभाकर कुसमोडे (रा. विश्वास सोसायटी, आयटीआय कॉलनीसमोर, इंदिरानगर) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या शुक्रवारी (ता.५) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सदरची घरफोडी करीत ७६ हजारांचे सोन्याचे दागिने व रोकड असा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात घरफोडीचे गुन्हे दाखल केले आहेत.

जुने सिडकोतील शिवाजीनगरमध्ये बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी १ लाख ५० हजारांची रोकड चोरून नेत घरफोडी केली.

हे ही वाचा:  नाशिक: छतावर सौर ऊर्जा निर्मितीसाठी महावितरणतर्फे मोफत नेट मीटर

भूषण भगवान भामरे (रा. शनि मंदिरांमागे, शिवाजी चौक, जुने सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या मंगळवार (ता.२) मध्यरात्री अज्ञात चोरट्याने सदरची घरफोडी केली. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे चोरीला:
सिन्नर फाटा परिसरातील महापालिकेच्या शाळेतील कार्यालयात लावलेले २४ हजार रुपयांचे दोन सीसीटीव्ही कॅमेरे अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहेत.

संतोष बाबुराव वाळुंज (रा. पवन रेसीडेन्सी, रा. चेहेडी पंपिंग, नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या २३ ते २९ डिसेंबर या दरम्यान सदरची चोरीची घटना घडली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790