नाशिक: शेअर ट्रेडिंगमधून जादा परताव्याचे आमिष पडले महाग! तब्ब्ल दीड कोटी रुपयांचा गंडा !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून मोठ्या रकमेची गुंतवणूक करण्यास भाग पाडून यापूर्वीही अनेकांना सायबर भामट्यांनी गंडा घातला आहे. तरीही अनेकजण अशा आमिषांना भुलून स्वत:ची फसवणूक करून घेतात. शहरातील दोघांना असेच आमिष दाखवून तब्बल १ कोटी ३४ लाखांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.

याप्रकरणी नाशिक शहर सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर भामट्यांकडून शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी सावज शोधतच असतात. व्हॉटसॲपच्या माध्यमातून ते अनेकांना शेअर ट्रेडिंगसंदर्भात मेसेजस्‌ पाठवत असतात. त्यानंतर ते प्रत्यक्ष व्हॉटसॲपवरून वा चॅटिंगद्वारे संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न असतात.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याचा खून करणाऱ्या संशयिताला कोठडी

असा प्रकार नाशिकमधील एकाला गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये करण बत्रा नामक सायबर भामट्याने व्हॉटसॲपद्वारे नाशिकच्या एका नागरिकाला संपर्क साधून शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर संशयित रिकीकी, राकेश सिंग यांनीही संपर्क साधून तक्रारदाराचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. तसेच, त्यानंतर संशयितांनी एक लिंक त्यांना पाठवून त्यावरून गुंतवणूक करण्यास सांगितले. संशयितांच्या आमिषाला बळी पडून तक्रारदाराने तब्बल ९२ लाख ५५ हजार ९०० रुपयांची गुंतवणूक केली. याच दरम्यान, संशयित सायबर भामट्यांनी नाशिकमधील कमलेश सुभाषचंद्र बरडिया यांनाही शेअर ट्रेडिंगमधून जादा परतावा मिळविण्याचे आमिष दाखवून त्यांचाही विश्वास संपादन केला.

हे ही वाचा:  नाशिक: सणांच्या पार्श्वभूमीवर ६२१ सराईत गुन्हेगारांवर कारवाई, ११ स्थानबद्ध

त्यामुळे बरडिया यांनीही ४२ लाखांची गुंतवणूक केली. मात्र, सायबर भामट्यांनी सांगितल्याप्रमाणे दोघाही तक्रारदारांना त्यांनी गुंतविलेल्या रकमेवर जादा परतावा लिंकवरील ॲपवर दिसत होता. परंतु सदरची रक्कम काढता येत नव्हती. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी नाशिक सायबर पोलिसात धाव घेतली. सायबर भामट्यांनी दोघांची १ कोटी ३४ लाख ५५ हजार ९०० रुपयांची फसवणूक केली आहे. सदरचा प्रकार फेब्रुवारी ते एप्रिल या दरम्यान घडला अहे. याप्रकरणी सायबर पोलिसात संशयित सायबर भामट्यांविरोधात आयटी ॲक्टअन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख हे तपास करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790