नाशिक: सराईत गुन्हेगाराचा त्याच्या राहत्या घरातच मित्रांनी केला खून

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): तडीपार संशयीताचा राहत्या घरात झोपेत तिघा संशयितांनी खून केला. शुक्रवार (ता.५) पहाटेच्या सुमारास गंजमाळ पंचशीलनगर येथे ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पांडुरंग उर्फ पांड्या हनुमंत शिंगाडे असे मृत तरुणाचे नाव आहे.

गंजमाळ पंचशीलनगर येथील पांडुरंग शिंगाडे काकाच्या दशक्रिया विधीसाठी शहरात आला होता. जागरणाचा कार्यक्रम संपन्न होऊन तो राहत्या घरी झोपेत होता. त्याच्या शेजारी त्याचा भाऊ विकास शिंगाडे हा देखील झोपलेला होता. शुक्रवार (ता.५) पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास तिघे संशयितांनी त्यांच्या घरात जाऊन पांडुरंग यास कोयता आणि चॉपरने मारहाण केली.

⚡ हे ही वाचा:  नाशिककरांनो लक्ष द्या ! शहरातील 'या' वाहतूक मार्गांत अतिशय महत्वाचे बदल !

भावाचा आवाज येत असल्याने विकास जागा झाला. त्याचा ओळखीचा संशयित कैलास गायकवाड कोयत्याने, दुसरा संशयित चॉपरने त्यास मारहाण करत होते. त्यानंतर त्यांची भाची घरात आली. संशयित कैलास गायकवाड यांनी तिला धक्का देत मुख्य दरवाजातून पळ काढला.

अन्य दोघा संशयितांनी घराच्या मागील खिडकीतून उड्या घेऊन फरार झाले. दरम्यान मृताच्या भावाने त्यास वाचवण्याचा प्रयत्न केला. संशयितांनी त्यास कोयत्याने मारण्याची धमकी दिल्याने तो भावास वाचवू शकला नाही. त्यांची मावशी आणि परिसरातील रहिवाशांनी पांडुरंग यास उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. संशयित पळ काढत असताना हातात चॉपर असलेल्या संशयितास भाचीने ओळखले. निखिल असे संशयिताचे नाव असून तो पांडुरंग याचा मित्र असल्याचे सांगितले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर विमानतळावर आगमन

घरात जाऊन खून केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत घटनेची माहिती घेतली. विकास शिंगाडे यांच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात कैलास आणि निखिल तसेच त्यांचा अन्य एक सहकारी तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. काही दिवसांपूर्वी झालेल्या वादातून खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलीस त्या दिशेने तपास करत आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: फूटपाथवर झोपलेल्या व्यक्तीचा वाहनाखाली मृत्यू

दोन महिन्यापूर्वी तडीपारी:
मयत पांडुरंग शिंगाडे सराईत गुन्हेगार होता. ५ मे रोजी त्यास दोन वर्षासाठी शहर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. एका दशक्रिया विधीसाठी गुरुवारी (ता.४) रोजी रात्री तो घरी आला होता. दरम्यान काही मित्रांबरोबर त्यांने जेवण करून घरी जाऊन झोपला. संशयितांनी घरात येऊन त्याच्यावर प्राणघातक हल्ला करून त्याचा खून केला. शहराबाहेर राहिला असता तर कदाचित त्याचा जीव वाचला असता.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here