नाशिक: अंबडला आर्थिक देवाण घेवाणीच्या वादातून युवकाचा खुन

नाशिक (प्रतिनिधी): अंबड पोलीस ठाणेच्या हद्दीत वीस वर्षीय तरुणाची हत्या झाली असून आर्थिक देवाण घेवाणीच्या करणावरून झालेल्या वादात महालक्ष्मी नगर येथे हनुमान मंदिर जवळ मयुर दातीर ( वय २० ) याच्यावर धारदार शस्त्राने छाती व पोटावर वार करून खुन केला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन

मयत मयूर हा गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास दुचाकी वर महालक्ष्मी नगर येथे हनुमान मंदिर जवळ आला असता पाठीमागुन दुचाकीवर अज्ञात गुन्हेगारांनी चाकुने वार करून खुन केला.

घटनेची माहिती समजताच पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, गुन्हे पोलीस उपकयुक्त प्रशांत बच्छाव,वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ सह अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत . पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ-२०२७च्या विकासकामांना गती द्या; दर्जाशी तडजोड सहन केली जाणार नाही : मंत्री गिरीश महाजन

दरम्यान संशयित मारेकऱ्यांना जोपर्यंत अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा अंबड ग्रामस्थांनी घेतला असून याबाबत अंबड गावहून मयताच्या घरी व तेथून अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी मोर्चा रवाना झाला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790