नाशिक: भरधाव वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवर डबलसिट प्रवास करणारा ठार

नाशिक (प्रतिनिधी): महामार्गावरील तपोवन क्रॉसिंग भागात भरधाव ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवर डबलसिट प्रवास करणारा ४६ वर्षीय इसम ठार झाला. या अपघातात दुचाकीचालकही जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 'लोकल टू ग्लोबल'च्या माध्यमातून नाशिकला जागतिक निर्यात केंद्र बनविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत- जिल्हाधिकारी

सचिन अशोकराव कोतवाल (४६ रा.सम्राट वृंदावन) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत महेंद्रसिंग विठ्ठलसिंग राजपूत (४३ रा.सेंधवा,बडवाणी मध्यप्रदेश) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. कोतवाल गेल्या गुरूवारी (दि.५) पहाटेच्या सुमारास मित्र राजपूत यांच्या मोपेड एमएच १५ जीक्यू २४२८ दुचाकीवर महामार्गाने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेशात अभ्यास दौऱ्याची संधी 17 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

दोघे मित्र डबलसिट द्वारका बाजूकडून पंचवटीच्या दिशेने प्रवास करीत असतांना डे्न्टल कॉलेज येथील तपोवन क्रॉसिंग भागात भरधाव आलेल्या एमएच ४० बीएल ४९०१ या मालट्रकने दुचाकीस धडक दिली. या अपघातात दोघे मित्र गंभीर जखमी झाले होते. त्यातील सचिन कोतवाल यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून राजपूत यांच्यावर उपचार सुरू आहेत, अधिक तपा हवालदार सानप करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790