नाशिक: भरधाव दुचाकी पुढे जाणा-या कारवर आदळली; दुचाकीस्वाराचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): मखमलाबाद ते सुयोजीत गार्डन रोडवर भरधाव दुचाकी पुढे जाणा-या कारवर जाऊन आदळल्याने चालकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: प्रमाणापेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचा अपघात, चार जण जखमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाऊलाल चिंधू सानप (४७ रा.रॉयल टाऊन बिल्डींग,सिध्दिविनायक अपा.मखमलाबाद) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. सानप गेल्या २८ मे रोजी दुपारच्या सुमारास मखमलाबादकडून सुयोजीत गार्डनच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. म्हसरूळ पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद १९ सप्टेंबर २०२३ रोजी करण्यात आली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: सराफ व्यावसायिकाने केली सेवानिवृत्त पोलीस अधिका-याची सव्वा पंधरा लाख रूपयाची फसवणूक

भरधाव दुचाकी पुढे जाणा-या कारवर जावून आदळल्याने ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून याप्रकरणी पोलिस दप्तरी अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार गवारे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790