नाशिक (प्रतिनिधी): चोपडा लॉन्ससमोर भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार वृद्ध ठार झाल्याची घटना घ़डली. विष्णू जयराम शिनगान (वय: ६५, राहणार: जोशीवाडा गंगापूर रोड, नाशिक) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.
या अपघाता विषयी मिळालेली माहिती अशी की, शिनगान हे दुचाकीने चोपडा लॉन्सकडून मखमलाबादकडे जात होते. त्यावेळी चोपडा लॉन्ससमोर अज्ञात चारचाकी वाहनाच्या चालकाने शिनगान यांच्या दुचाकीस समोरून धडक दिली.
या धडकेने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना प्रथम साई समर्थ हॉस्पिटलमध्ये प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी आडगाव मेडिकल कॉलेज येथे दाखल केले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (सरकारवाडा पोलीस स्टेशन, अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक: २८/२०२५)