नाशिक: ट्रॅक्टरच्या धडकेत ४० वर्षीय इसमाचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): ट्रॅक्टरच्या धडकेत ४० वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची नाशिकच्या पेठरोड येथे घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश रमेश वाघ ( रा.चापडगाव ता.दिंडोरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. वाघ ३१ ऑक्टोबर रोजी मित्र संजय नामदेव चावरे (४० रा.चापडगाव ता.दिंडोरी) याच्यासमेवत पेठरोडवरील आशेवाडी बारी येथील म्हसोबा मंदिरात देवदर्शनासाठी गेले होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आडगाव मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट दुर्घटना; महिला गंभीर जखमी

दर्शन घेवून दोघे मित्र रस्ता ओलांडत असतांना हा अपघात झाला. पेठरोडकडे भरधाव जाणा-या एमएच २६ के ८४८८ या ट्रॅ्क्टरने चावरे यांना जोरदार धडक दिली. या अपघातात चावरे याच्या अंगावरून ट्रॉलीचे चाक गेल्याने त्याचा मृत्यू झाला असून, याप्रकरणी पसार झालेल्या ट्रॅक्टर चालकाविरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार राजू जगताप करीत आहेत. (म्हसरूळ पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: २८२/२०२४)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790