नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): महामार्गावरील सयाजी हॉटेल जवळ भरधाव अॅटोरिक्षाने दिलेल्या धडकेत ७२ वर्षीय वृध्द ठार झाले. तुळशीराम हंसराज गायकवाड (रा.शिवमुद्रा चौक,इच्छामणी नगर जत्रा हॉटेल) असे मृत वृध्दाचे नाव आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गायकवाड बुधवारी (दि.७) सर्व्हीसरोडने आपल्या घराकडे पायी जात असतांना सयाजी हॉटेल परिसरात भरधाव अॅटोरिक्षाने त्यांना धडक दिली होती. बेशुध्द अवस्थेत ते रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत मिळून आल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.
जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतांना मध्यरात्री वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. हरिश गायकवाड यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.