नाशिक: हृदयद्रावक- दुचाकीच्या धडकेत सासरे-जावई ठार

नाशिक (प्रतिनिधी): धूम स्टाइल स्पोर्ट्स बाईक रायडिंग करत सुसाट दुचाकी दामटविणाऱ्या बेभान तरुणांनी चेहेडीजवळ एका मोपेड दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार सासरे व जावई गंभीररित्या जखमी होऊन मृत्यूमुखी पडले. महेश नरवाडे (३५, रा. कारखानारोड), अनिल बाबूराव लाजरस (७१, रा. गोरेवाडी) अशी मृतांची नावे आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चोरीच्या पाच मोटारसायकलींसह आरोपी अटकेत; पाच गुन्हे उघडकीस

पुणे महामार्गावरील पळसे शिवारातून नाशिक रोडच्या दिशेने रविवारी (दि.२) महेश हे त्यांचे सासरे अनिल लाजरस यांना दुचाकीवर (एम.एच१५ जीटी ८८३०) बसवून प्रवास करत होते. यावेळी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नाशिक रोडकडून सुसाट वेगाने आलेल्या बाइकच्या (एम.एच ४७ एस १२२२) चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत त्यांच्या दुचाकीला श्रमिकनगरजवळच्या नीळकंठेश्वर मंदिराजवळ जोरदार धडक दिली. त्यामुळे दोघेही रस्त्यावर कोसळले. दोघांना डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकच्या सायकलपटूंनी रॅलीतून दिला 'माझा भारत - माझं मत'चा संदेश

याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत नाशिकरोड पोलिस ठाण्यात दुचाकीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: १२०/२०२५)

स्पोर्ट्स बाइकस्वार दोघेही तरूण स्टंटबाजी करत धूम स्टाइल दुचाकी दामटवत होते, असे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. धोकेदायक पद्धतीने दुचाकी चालवत रायडिंग करत असताना त्यांनी अन्य वाहनांनाही हुलकावणी दिली होती. याचवेळी बाईकचालकाचे नियंत्रण सुटले व त्याने समोरून येणाऱ्या मोपेड दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे सासरे व जावई यांना नाहक जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790