🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: गुलमोहर वृक्ष कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू, दोन महिन्यांतील दुसरी दुर्घटना

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): सातपूरच्या शिवाजीनगर परिसरातील पाझर तलाव भागात बुधवारी (दि. २६) सायंकाळी ७.३० च्या सुमारास कामावरून दुचाकीने घरी परतणाऱ्या तुषार रघुनाथ पवार (वय: ३६) या युवकाचा गुलमोहर वृक्ष कोसळून जागीच मृत्यू झाला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन

गुलमोहर वृक्ष कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची ही दोन महिन्यातील दुसरी घटना आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार रघुनाथ पवार हे आपल्या दुचाकीने शिवाजीनगरकडून गंगावऱ्हे येथे सायंकाळी साडेसातच्या सुमारास जात असतांना हा अपघात घडला. पवार हे जात असतांना शिवाजीनगर पाझर तलावाजवळील जीर्ण गुलमोहर वृक्ष अचानक त्यांच्या दुचाकीवर कोसळला. यात ते गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी पवार यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासून पवार यांना मृत घोषित केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पीयूसीसी सेवेसाठी वाहन मालकांचा आधार प्रमाणीकरण केलेला मोबाईल क्रमांक अनिवार्य

सातपूरच्या शिवाजीनगर परिसरात जोरदार पाऊस नसतांना गुलमोहर वृक्ष कोसळून दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790