नाशिक। दि. २६ मे २०२५: अज्ञात चार चाकी वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी १६ वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अनुष्का शांताराम निमसे (१६ रा.वरवंडीरोड नांदूर पो. माडसांगवी ता.जि.नाशिक) ही विद्यार्थीनी गेल्या गुरूवारी (दि.२२) सायंकाळच्या सुमारास शिकवणीवरून आपल्या दुचाकीने घराकडे जात असतांना अपघात झाला. जत्रा हॉटेलकडून नांदूर नाक्याच्या दिशेने ती प्रवास करीत असतांना शिवकृपा स्विटस या दुकानासमोर अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीस धडक दिली.
या अपघातात अनुष्का गंभीर जखमी झाल्याने तिला प्रथम नजीकच्या जगदंब हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. प्रथमोपचारानंतर तिला अशोका हॉस्पिटल येथे हलविण्यात आले असता उपचार सुरू असतांना रविवारी (दि.२५) डॉ. शेखर चिरमाडे यांनी तपासून तिला मृत घोषीत केले. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.