नाशिक: भरधाव अज्ञात आयशर मालट्रकने धडक दिल्याने २० वर्षीय तरूण ठार

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): पेठरोडवरील नमन हॉटेल भागात भरधाव अज्ञात आयशर मालट्रकने धडक दिल्याने २० वर्षीय तरूण ठार झाल्याची घटना घडली. या घटनेत किरण संतोष वड (२० रा.मातोरी ता.जि.नाशिक) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गंगापूर रोडवर जाहिरातींना अडसर ठरतात म्हणून ५५ झाडे तोडली; सहा जणांना अटक

याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात पसार झालेल्या ट्रकचालका विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरण वड हा युवक रविवारी (दि.२२) सायंकाळच्या सुमारास आपल्या दुचाकीवर पेठरोडने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. नमन हॉटेल परिसरातील हरिओम लॉन्ड्री समोर नाशिककडून पेठच्या दिशेने भरधाव जाणा-या मालट्रकने दुचाकीस धडक दिली.

🔎 हे वाचलं का?:  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

या अपघातात किरण गंभीर जखमी झाला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत पोलिस शिपाई योगेश पवार यांनी दिलेल्या फिर्याद दिली आहे. अपघातानंतर ट्रकचालक आपल्या वाहनासह पसार झाला असून अधिक तपास हवालदार फुगे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790