नाशिक। दि. २० ऑक्टोबर २०२५: वळण घेणाऱ्या चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला. स्वामी नारायण मंदिराकडून तपोवनकडे जाणाऱ्या रोडवर हा अपघात घडला.
आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरत वाघेला (रा. बोधलेनगर) यांनी तक्रार दिली. (एमएच १५ बी.एस.२६२२) दुचाकीचालक मित्र दीपक रघुनाथ चौधरी (३९) हे चालवत होते. वाघेला हे मागे बसले होते. वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि पथदीपावर दुचाकी धडकली. चौधरी यांच्या चेहऱ्यास, डोक्याला गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत सिव्हिलमध्ये दाखल केले. उपचार सुरू असताना मृत्यू झाला. पोलिस तपास करित आहेत. (आडगाव पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३४८/२०२५)
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790