NC

नाशिक: भरधाव छोटा हत्ती टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): सिन्नर फाटा भागातील रेल्वे ब्रिज भागात भरधाव छोटा हत्ती टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. गुलाम मुस्तफा (रा. सादिकनगर, वडाळागाव) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  चौथे विश्व मराठी संमेलन: कृत्रिम बुद्धिमतेच्या माध्यमातून मराठी भाषेत ज्ञान, सेवा व विविध क्षेत्रात संधी उपलब्ध होणार- संतोष साळवी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुलाम मुस्तफा हे मंगळवारी (दि.१२) सायंकाळच्या सुमारास सिन्नर फाट्याकडून नाशिककडे आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. रेल्वे लाईन वरिल उड्डाणपूलावरून ते प्रवास करीत असतांना पाठीमागून भरधाव आलेल्या एमएच ०४ इबी १२६८ या छोटा हत्ती टेम्पोने दुचाकीस धडक दिली.

🔎 हे वाचलं का?:  चौथे विश्व मराठी संमेलन: संमेलनातील स्टाॅलवरील चरित्रग्रंथ आणि कथांना वाचकांची विशेष पसंती

या अपघातात त्यांचा मृत्यू झाला असून दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. याबाबत हवालदार ठेपणे यांनी फिर्याद दाखल केली असून अधिक तपास उपनिरीक्षक आडके करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790