ह्रदयद्रावक! पाच वर्षीय चिमुकलीचा सिटी लिंक बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात शहरातील बसच्या धडकेत एका शाळकरी मुलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

पाच वर्षीय चिमुकलीचा सिटी लिंक बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. “वाहन चालकाला अटक करा”, या मागणीसाठी नागरिकांचा महाव्यवस्थापक कार्यालय येथे मोर्चा निघाला. नागरिकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. सदर घटना ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’चा प्रकार असल्याचा संतप्त जमावाकडून आरोप करण्यात आला आहे.

चिमुकलीच्या मृत्यूने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. सिटीलिंक बस सुरू झाल्यापासून सतत वादग्रस्त ठरत आलेली आहे. यापूर्वीही सिटी लिंक बसमुळे नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आज, म्हणजेच बुधवारी अपघाताची पुनरावृत्ती होऊन एका पाच वर्षीय मुलीचा नाहक बळी गेला. गाडेकर मळा परिसरात असलेल्या सिटी लिंक बसडेपोच्या आवारात सिटी लिंक बसने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाच वर्षाची चिमुकली ठार झाली असून या अपघातानंतर संतप्त झालेल्या जमावाने सिटी लिंक बस महाव्यवस्थापनाला धारेवर धरले.

हे ही वाचा:  नाशिक: स्टॉक ट्रेडिंगच्या बहाण्याने दाम्पत्याने केली दोन लाखांची फसवणूक

अपघात झाल्यानंतर बस चालक फरार झाला असून संबंधित बस चालक हा दारू प्यायलेला असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केलेला आहे. संतप्त जमावाने बस फोडण्याचा प्रयत्न केला पण वेळीच नाशिकरोड पोलिस दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला. सानवी सागर गवई (वय ५ वर्ष, राहणार मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, रेल्वे माल धक्का, नाशिक रोड) असे अपघातात ठार झालेल्या बालिकेचे नाव आहे.

हे ही वाचा:  नाशिक: चेन स्‍नॅचरसह दोघा सराफांना 3 वर्षे सश्रम कारावास !

अपघातात ठार झालेली सानवी आदर्श विद्यामंदिर मध्ये इयत्ता पहिली मध्ये शिकत असून शाळेतून आजोबा सोबत घरी जात असताना सिटी लिंक बस डेपोच्या आवारात (एम.एच. १५ जी. व्ही ७७१९) सदरच्या बसची धडक बसल्याने चिमुरडी जागीच ठार झाली. दरम्यान या अपघातानंतर बस चालक हा तिथून फरार झाला.

हे ही वाचा:  महत्वाची बातमी: रेल्वे तिकीट आरक्षणाच्या नियमात मोठा बदल; फक्त इतके दिवस आधी करता येणार बुकिंग

ही घटना आजूबाजूच्या नागरिकांना व माल धक्का परिसरात असलेल्या कामगारांना समजताच मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिक व कामगार जमा झाले. यावेळी अनेक नागरिक व कामगारांनी डेपो व्यवस्थापनाला धारेवर धरून याप्रकरणी जाब विचारला. सदरचा बस चालक कुठे फरार झाला का? त्याला लपवून ठेवले आहे की काय? असा सवाल उपस्थित नागरिकांनी केला. अपघात प्रकरणी तातडीने बस चालकाला अटक करून कारवाई करावी, अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली.

दोन तास नागरिकांनी मृतदेह गाडीखालून काढून दिला नव्हता. पोलिसांच्या मध्यस्थीने मृतदेह गाडीखालून काढण्यात आला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790