नाशिक: वीटभट्टीवर खड्ड्यात कोसळून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): पळसे कारखाना रोड येथील वीटभट्टी येथे तीन वर्षाची मुलगी खेळता खेळता पाणी साठवलेल्या खड्ड्यात पडून मृत्युमुखी पडली.

हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत झाले 'इतके' टक्के मतदान…

पळसे नासाका कारखाना रोडवर असलेल्या एका वीटभट्टीवर उत्तर प्रदेशातील कुटुंब कामगार मजूर म्हणून कामाला आहेत. त्यांची तीन वर्षाची मुलगी रिंकी गंगाराम गौतम ही गुरुवारी (दि.११) सकाळी दहा वाजेच्या सुमारास काही मुलांसोबत वीटभट्टी जवळ खेळत होती.

हे ही वाचा:  नाशिक: पाऱ्यात घसरण, थंडीचा जोर वाढला; नाशिकचे किमान तापमान 12.4 तर, निफाड 10.9 अंश सेल्सियस

वीटभट्टी जवळ माती कालवण्यासाठी पाण्याच्या साठवणुकीकरिता खोदलेल्या खड्ड्यात ती पडली यावेळी तिच्यासोबत खेळणाऱ्या इतर मुलांनी लागलीच आपल्या पालकांना सदर प्रकार सांगितला.

हे ही वाचा:  नाशिक: वेब कास्टिंग कक्षाद्वारे जिल्ह्यातील मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे निरीक्षण

मजूर कामगारांनी घटनास्थळी धाव घेऊन खड्यात साठवलेल्या पाण्यात पडलेल्या रिंकीला बाहेर काढून तत्काळ दवाखान्यात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790