धक्कादायक: नाशिक शहरात रविवारी 31 मे रोजी दिवसभरात 30 पॉझिटिव्ह रुग्ण

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात रविवारी (दि. ३१ मे २०२०) दिवसभरात ३० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार ९ तर सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार अजून २१ असे एकूण ३० रुग्ण दिवसभरात आढळले आहेत . नाशिक शहरातल्या विविध भागातील हे रुग्ण आहेत. आतापर्यंत एका दिवसात सापडलेली ही सगळ्यात जास्त रुग्णसंख्या आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एसटी बस नियोजनात उद्यापासून (दि. ११) महत्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर...

रविवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये पाथर्डी फाटा -१, दोंदे मळा (नाशिक रोड)-१, स्नेह नगर -१, वडाळा गाव -२, काळे चौक (वडाळा नाका)-१, खोडे नगर (वडाळा नाका)-१, झीनत नगर (वडाळा गाव)-१, अशोका मार्ग-१, वडाळा गाव (मेहेबुब नगर)-७, गोसावी वाडी (नाशिकरोड)-१, कला नगर (दिंडोरी रोड)-१, विनय नगर-२, लेखा नगर -१ यांचा समावेश आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मोबाईल टॉवर बसविण्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

सकाळी प्राप्त झालेल्या अहवालातील रुग्णांची माहिती व हिस्ट्री:

पंचशील नगर गंजमाळ येथील ३५ वर्षीय महिला यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

ड्रीम व्हॅली शिंगाडा तलाव, फायर ब्रिगेड समोरील ४६ वर्षीय व्यक्तीचा अहवाल कोरोना बाधीत आला आहे.

सिव्हिल हॉस्पिटल मालेगाव येथे कार्यरत असणाऱ्या ३२ वर्षीय हेल्थ वर्कर यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिटीलिंकच्या 'या' भागांतील वाहतूक मार्गात तात्पुरता बदल

ओम गुरुदेव नगर मखमलाबाद रोड येथील रुग्णाच्या संपर्कातील २१ वर्षीय व २३ वर्षीय युवक तसेच ४६ वर्षीय महिला कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

लेखानगर येथील रुग्णाच्या संपर्कातील ३२ वर्षीय व ३५ वर्षीय पुरुष व ५५ वर्षीय महिला कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790