Amazon

नाशिक: उन्हाळी सुट्ट्यांमुळे ‘सिटी लिंक’च्या ३५ बसफेऱ्यांमध्ये कपात

नाशिक (प्रतिनिधी): शाळा आणि महाविद्यालयांना उन्हाळी सुट्ट्या लागल्यामुळे तसेच दुपारच्या वेळेत तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शहरातील प्रवाशांची संख्या घटली आहे. याचा थेट परिणाम ‘सिटी लिंक’ बससेवेवर झाला असून, प्रवासी संख्येतील घट लक्षात घेता व्यवस्थापनाने ३५ बसफेऱ्या तात्पुरत्या स्वरूपात कमी केल्या आहेत.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळा: रामकुंड परिसरातील कामे ३ आठवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश

विशेषतः, नाशिकरोड ते सिम्बायोसिस महाविद्यालय मार्गावरील दुपारी १ ते सायंकाळी ५ दरम्यानच्या फेऱ्यांमध्ये कपात करण्यात आली आहे. सध्या तपोवन डेपोतील चार मार्गांवरील ११२ फेऱ्या तसेच नाशिकरोड डेपोतील १८ बसफेऱ्या बंद करण्यात आल्या असल्याची माहिती ‘सिटी लिंक’चे व्यवस्थापक मिलिंद बंड यांनी दिली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790