
नाशिक: दरवर्षी मार्च महिन्यात जागतिक महिला दिन आणि वैद्यकीय क्षेत्रात जागतिक किडनी दिवस साजरा केला जातो, यंदा अपोलो हॉस्पिटल नाशिक मध्ये मार्च महिन्यात चार किडनी प्रत्यारोपण शस्रक्रिया यशस्वी पार पडल्या आणि विशेष म्हणजे या तीनही शस्रक्रियांमध्ये किडनी दान करणाऱ्या डोनर या महिला आहेत, यामुळे महिला जशा इतर सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत तशाच अवयव दानासारख्या श्रेष्ठ दानात देखील महिलाच अग्रेसर आहेत !
यावेळी बोलताना अपोलो हॉस्पिटलमधील किडनी विकार आणि प्रत्यारोपण तज्ञ डॉ.मोहन पटेल म्हणाले कि “देवाने स्री ला प्रेम, जिव्हाळा, समर्पण, निस्वार्थ या सर्वोच्च गुणांची देणगी दिली आहे, अपोलो हॉस्पिटल्स नाशिक मध्ये मार्च महिन्यात ४ किडनी प्रत्यारोपण शस्रक्रिया यशस्वी केल्या यात पहिल्या किडनी प्रत्यारोपणात मोठ्या बहीणीने आपल्या लहान भावाला किडनी दान केली , दुसऱ्या किडनी प्रत्यारोपणात आईने मुलाला आणि तिसऱ्या प्रत्यारोपणात पत्नी ने आपल्या पतीला आणि चौथ्या किडनी प्रत्यारोपणात देखील पत्नी ने आपल्या पतीला किडनी दान केली आहे. ज्यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांसोबत किडनी ट्रान्सप्लांट बद्दल चर्चा सुरु असते त्यावेळी देखील रुग्णाच्या नात्यातील महिलांचा नेहमीच अवयव दानाबाबत सकारात्मक दृष्टिकोन असतो आणि त्या अवयव दान करण्यास तयार असतात.
युरोसर्जन डॉ. किशोर वाणी म्हणाले कि ” किडनी डोनर ची किडनी लॅप्रोस्कोपिक पद्धतीने काढली जाते जेणेकरून किडनी काढल्यानंतर ऑपरेशन नंतरचे दुखणे कमी असते, त्या जागेवर कमीतकमी व्रण दिसतो आणि डोनर ला लवकर डिस्चार्ज मिळतो. बऱ्याच वेळा घरातील महिलाच डोनर असतात आणि रुग्णाच्या डिस्चार्ज नंतर रुग्णाची काळजी घेण्याची संपूर्ण जबाबदारी त्या स्वतः घेतात.
अपोलो हॉस्पिटल्सचे युनिट हेड अजित झा म्हणाले कि “अपोलो हॉस्पिटल नाशिक मध्ये कॅडेवर किडनी ट्रान्सप्लांट, लाईव्ह किडनी ट्रान्सप्लांट, ABO इन कॉम्पिटेबल किडनी प्रत्यारोपण, स्वॅप किडनी प्रत्यारोपण अशा ४ पद्धतीने किडनी प्रत्यारोपण होत आहे, आतापर्यंत १५३ किडनी प्रत्यारोपण शस्रक्रिया झाल्या असून यामध्ये किडनी दान करणाऱ्या महिलांचे म्हणजेच डोनर महिलांचे प्रमाण ८०% हुन अधिक आहे, त्यामुळे महिला जशा इतर सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत तशाच अवयव दानासारख्या श्रेष्ठ दानात देखील महिलाच अग्रेसर आहेत.
यावेळी किडनी प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांसमवेत किडनी विकार आणि प्रत्यारोपण तज्ञ डॉ. मोहन पटेल, युरोसर्जन डॉ. किशोर वाणी, डॉ. भूषण पाटील, भूलतज्ञ डॉ. चेतन भंडारे,डॉ. भूपेश पराते, अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. प्रवीण ताजणे, अपोलो हॉस्पिटलचे युनिट हेड अजित झा आणि अवयव प्रत्यारोपण समन्वयक सौ.चारूशीला जाधव उपस्थित होते.
![]()


