नाशिक एसीबीची गोंदियात धडाकेबाज कारवाई; लाचखोर मोटारवाहन निरिक्षकासह तिघे जाळ्यात

नाशिक (प्रतिनिधी): राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरिल देवरी येथील सिमा तपासणी नाक्यावर सुरू असलेल्या भ्रष्टाचार नाशिक येथील लाचलुचपत विभागाने सापळा रचून उघडकीस आणला आहे. कागजपत्राची कसलीही उणिव नसतांनाही एका वाहन धारकाकडून खाजगी व्यक्तीच्या माध्यमातून ५०० रुपयाची लाच स्विकारतांना मोटरवाहन निरिक्षकासह तिघांना ११ एप्रिल रोजी जाळ्यात अडकले.

तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्याच्या विरुद्ध देवरी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. मोटरवाहन निरिक्षक योगेश गोविंद खैरनाथ (४६) रा. नागपूर, नरेंद्रमोहनलाल गडपायले (६३) रा. गोंदिया, आश्लेष विनायक पाचपोर (४५) रा. अमरावती असे आरोपींची नाव आहे.

⚡ हे ही वाचा:  मोठी बातमी! आयटीआर फायलिंगला मुदतवाढ, करदात्यांना मोठा दिलासा

सविस्तर असे की, राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वर देवरी तालुक्याच्या सिमेवर सिमा तपासणी नाका आहे. नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडून या ठिकाणी मोटरवाहन निरिक्षक यांना कर्तव्यावर पाठविले जाते. मात्र कोणत्या न कोणत्या कारणाने वाहनधारक तथा चालकांना अडचणीत आणून त्यांच्याकडून अवैध वसूलीचे काम गेल्या अनेक वर्षापासून केले जात आहे. यासाठी खाजगी व्यक्तीही ठेवण्यात आलेल्या आहेत.

या प्रकाराच्या तक्रारीवरून नाशिक येथील लाचलुचपत विभागाचे पथक देवरी येथे दाखल झाले. दरम्यान सिमा तपासणी नाक्यावर एका वाहन धारकाला कसलेही कारण नसतांना खाजगी व्यक्तीकडून ५०० रुपयाची लाच मागण्यात आली. दरम्यान सदर लाच कार्यरत मोटारवाहन निरिक्षक यांच्या संमतीने मागण्यात येत असल्याचे प्रकार समोर आले. त्यातच वाहन धारकाकडून ५०० रुपयाची लाच स्विकारतांना आश्लेष पाचपोर याला रंगेहात पकडण्यात आले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 30 सप्टेंबरपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी !

या प्रकरणात आरोपीमोटरवाहन निरिक्षक योगेश खैरनार (४६) रा. नागपूर, नरेंद्र मोहनलाल गडपायले (६३) रा. गोंदिया, आश्लेष विनायक पाचपोर (४५) रा. अमरावती या तिघांना अटक करण्यात आली आहे. तिन्ही आरोपी विरुद्ध देवरी पोलिस ठाण्यात लाचलुचत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: प्रेयसीच्या पतीचा खून करून फरार झालेल्या प्रियकरासह त्याच्या मित्राला अटक !

ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनात नाशिकचे पोनि. संदीप घुगे, पो. हवा. गणेश निंबाळकर, नितीन नेटारे यांनी केली. या कारवाईमुळे प्रादेशिक परिवहन विभागात एक खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे सिमा तपासणी नाक्यावर सुरू असलेला भ्रष्टाचार उघडकीस आल्याने सर्वसामान्य नागरिकाकंडून या कारवाईचे स्वागत केले जात आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here