नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात आजपासून पाच दिवस ओसरणार पावसाचा जोर

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): राज्यात मान्सूनसाठी तीव्र स्वरूपातील विशेष कोणतीही वातावरणीय प्रणाली नसल्याने मराठवाडा, नाशिकसह उत्तर व मध्य महाराष्ट्रात शुक्रवारपासून (दि.१४) पाच दिवस पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरणार असून तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस होईल.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ.गेडाम यांच्या हस्ते ध्वजारोहण

तर मुंबईसह कोकण व विदर्भात मान्सून पोहचलेल्या काही जिल्ह्यांत २० जूनपर्यंत मध्यम पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागातील निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.

मराठवाडा, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांत १८ जूनपर्यंत पावसाचा जोर काही प्रमाणात कमी होऊन तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. मुंबई, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गसह विदर्भातील काही जिल्ह्यांत २० जूनपर्यंत मध्यम पावसाची शक्यता आहे. दरम्यान, नाशिकमध्ये गुरुवारी दुपारनंतर २ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  राज्यात दोन दिवस ढगाळ वातावरण; काही भागांत हलक्या पावसाची शक्यता

राज्यात गुरुवारी पडलेला विविध शहरांतील पाऊस:
नाशिक २, अलिबाग ३, रत्नागिरी १९, महाबळेश्वर २६, सांगली १, सोलापूर ४. जेऊर ५, छत्रपती संभाजीनगर ३. जालना ४, नांदेड १ (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790