नाशिक (प्रतिनिधी): आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास भारत पेट्रोलियम मधून घरगुती गॅस सिलेंडर भरलेला ट्रक क्र. एम एच १५ एच एच २७८४ हा मालवाहू ट्रक ओझर सर्विस रोडने मालेगावकडे जात असतांना त्याच वेळी दुचाकीवर अर्पिता प्रकाश शिंदे, व तिची आई आणि बहिण जात होत्या.
ट्रक चालकाने दिलेल्या धडकेत तिघी जणी खाली पडल्या यात उपस्थित नागरिकांनी आरडाओरड केल्याने ट्रक ड्रायव्हरने ब्रेक लावला त्यात अर्पिता शिंदे ही डाव्या बाजूकडील मागच्या चाकात अडकल्याने जागीच गतप्राण झाली तर आईला आणि बहिणीला पायाला दुखापत झाली.
यावेळी ट्रक चालकाला नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. तर आईला हॉस्पिटलला दाखल करण्यात आले. अर्पिताचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पिंपळगाव येथे नेण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ओझर पोलीस करत आहे.
ओझर गावात राहणारी अर्पिता शिंदे ही ओझर येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या अभिनव बाल विकास मंदिर येथे इयत्ता तिसरीत शिकत होती. तिच्या दुर्दैवी अपघाताची बातमी समजताच शाळेवर शोककळा पसरली.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790