राज्यात आज-उद्या तुरळक पावसाची शक्यता !

पुणे। दि. ०७ ऑक्टोबर २०२५: राज्याच्या अनेक भागात मंगळवारी आणि बुधवारी तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा जोर राहणार आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: जिल्ह्यातील सोनोग्राफी केंद्रांची नियमित तपासणी करावी- जिल्हाधिकारी जलज शर्मा

सोमवारपर्यंत अरबी समुद्रातील शक्ती वादळ पश्चिममध्य अरबी समुद्रात पोहोचले असून, मंगळवार सकाळपर्यंत याचा प्रभाव कमी होऊन त्याचे न्यून दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होणार आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: रस्त्यावर अडवत जबरी लूट करणाऱ्या दोघा सराईतांना अटक !

येत्या तीन ते चार दिवसांत परतीचा पाऊस राज्यातून माघारी फिरण्यास सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, पुढील ३ दिवस मध्य महाराष्ट्र, नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790