राज्यात दोन दिवस पावसाचे! ‘या’ जिल्ह्यांत अलर्ट जारी, काय सांगतो IMDचा अंदाज?

मुंबई। दि. २४ ऑक्टोबर २०२५: राज्यभरात यंदा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतीचे वेळोवेळी नुकसान झालेले असतानाच आता नोव्हेंबरमध्येही कोकण विभागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

गुरुवारी जाहीर झालेल्या पुढील दोन आठवड्यांच्या पूर्वानुमानानुसार २३ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर या कालावधीत राज्यभरात तसेच त्यानंतर ६ नोव्हेंबरपर्यंत कोकण विभागात पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे आता पिकांवरील परिणामांची चिंता निर्माण झाली आहे.

गुरुवार २३ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या आठवड्यामध्ये भारताच्या दक्षिणेकडील अर्ध्या भागात सरासरीहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य भारताचा काही भाग, तेलंगण, ईशान्य भारताचा बहुतांश भाग येथे पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टी तसेच कर्नाटक, केरळ किनारपट्टी येथे पावसाची तीव्रता सरासरीहून अधिक असू शकेल अशीही शक्यता आहे.

⚡ हे ही वाचा:  चार दिवस पावसाचे: हवामान विभागाकडून अलर्ट जारी.. 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट !

अरबी समुद्राच्या आग्नेयेला असलेली तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राची प्रणाली उत्तर आणि ईशान्य दिशेला सरकत आहे. तसेच तमिळनाडू आणि कर्नाटकच्या अंतर्भागात असलेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम ते वायव्य दिशेदरम्यान प्रवास करत आहे. याचा संयुक्त परिणाम म्हणून राज्यात तसेच देशाच्या दक्षिण भागात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. २७ ऑक्टोबरला हिमालयाच्या पायथ्याशी पश्चिमी प्रकोपाची प्रणाली निर्माण होणार आहे. याचा संयुक्त परिणाम म्हणून येत्या काळात पावसाची स्थिती निर्माण होणार आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: सरकारी अधिकारी असल्याचे सांगत ज्येष्ठ नागरिकाचा दीड तोळ्याचा सोन्याचा गोफ लांबवला

प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये शुक्रवारी आणि शनिवारी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबतच ठाणे, पालघर जिल्ह्यामध्येही रविवारपर्यंत हीच स्थिती असेल. त्यामुळे तिन्ही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड तसेच रत्नागिरीमध्ये शुक्रवार आणि शनिवारी, रायगड जिल्ह्यात सोमवारी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात शुक्रवारी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत यलो अलर्ट आहे. अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यात सोमवारपर्यंत यलो अलर्ट कायम आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवार, सातारा, सांगली जिल्ह्यात शनिवारपर्यंत यलो अलर्ट असेल. मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी शनिवारपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे.

⚡ हे ही वाचा:  चार दिवस पावसाचे: हवामान विभागाकडून अलर्ट जारी.. 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट !

मुंबईमध्ये ऑक्टोबर महिन्यात पावसाचे सरासरी दिवस ३.९ असतात. तर महिन्याभरात सरासरी पाऊस ९१.३ मिलीमीटर इतका नोंदला जातो. ऑक्टोबरमध्ये मुंबईत सरासरी कमाल तापमान ३३.६ अंश सेल्सिअस असते. सध्या तापमान मात्र सरासरीपेक्षा अधिक आहे. अवकाळी पावसाच्या हजेरीने मुंबईसह इतरही भागांमधील तापमानाचा पारा किंचित खाली उतरेल अशी शक्यता आहे. या पावसामुळे तापमानात दिलासा मिळाला तरी पिकांच्या होणाऱ्या नुकसानीची चिंता अधिक महत्त्वाची आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790