30 जूनपर्यंत एच.एस.आर.पी नंबर प्लेट बसवण्याचे आवाहन
नाशिक। दि. १० जून २०२५: वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP) बसविणे आवश्यक आहे. त्यानुसार परिवहन विभागाच्या 23 डिसेंबर 2024 रोजी परिपत्रकानुसार जिल्ह्यातील 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादित वाहनांच्या धारकांनी 30 जून 2025 पर्यंत आपल्या वाहनाची एच.एसच.आर.पी. नंबर प्लेट बसविण्याची कार्यवाही करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
वाहनांना एच.एस.आर.पी. नंबर प्लेट बसविण्यासाठी नाशिक जिल्ह्यासाठी M/s. FTA HSRO solutions pvt. Ltd ही एजन्सी निश्चित करण्यात आली आहे. वाहनधारकांनी https://maharashtrahsrp.com/ अथवा http://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळवार अर्ज करून आपल्या वाहनास HSRP नंबर प्लेट बसवून घ्यावी.
1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या ज्या वाहनांना HSRP नंबर प्लेट 30 जून 2025 पर्यंत न बसविल्यास अशा वाहनांचे मालकी हस्तांतरण, नोंदणी प्रमाणपत्रामध्ये (RC) पत्ता बदल करणे, वित्त बोजा चढविणे/ उतरविणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र देणे, ना-हरकत प्रमाणपत्र जारी करणे, वाहनांमध्ये बदल करणे इत्यादी वाहन विषयक कामे HSRP नंबर प्लेट बसविल्याशिवाय 16 जून 2025 पासून बंद करण्यात येणार आहे. तथापि ज्या वाहन मालकांनी HSRP नंबर प्लेट बसविण्यासाठी नियोजित वेळ व दिनांक घेतला असल्यास त्याची पावती उपरोक्त कायदपत्रांसोबत जोडल्यास त्यांच्या वाहनांचे पुढील कामकाज करण्यात येणार आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790