आज (दि. १२ सप्टेंबर) राज्यभरात हलका ते मध्यम पावसाचा नागपूर वेधशाळेचा अंदाज

नाशिक (प्रतिनिधी): आज (दि. १२ सप्टेंबर) राज्यभरात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तविला आहे.

तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आता अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रुपांतरित झाले असून हे क्षेत्र आता मध्य प्रदेशाच्या ईशान्य ते मध्य भागावर सक्रिय आहे. त्याचप्रमाणे वातावरणातील खालच्या थरातील वाऱ्याची द्रोणिका रेषा ही दक्षिण गुजरात ते उत्तर केरळपर्यंत सक्रिय आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 27 जून पर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी

त्यामुळे गुरुवारी कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. गुरुवारी पुणे, सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना नागपूर वेधशाळेने यलो अलर्ट दिला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790