नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत १२ जानेवारीला राष्ट्रीय युवा महोत्सवाचे नाशिकमध्ये उद्घाटन होणार आहे. युवा महोत्सवाच्या मैदानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी (ता. ८) दुपारी ३.२० ला नाशिकमध्ये येणार आहेत.
तब्बल १६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्राला राष्ट्रीय युवा महोत्सवाचे यजमानपद मिळाले आहे.
त्यातही नाशिकमध्ये हा महोत्सव होत असल्याने राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री दादा भुसे यांनी कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये मुक्कामी आहेत.
युवा महोत्सवाचा उद्घाटन सोहळा तपोवनात होणार आहे. यासाठी देशभरातील आठ हजार युवक-युवती पाच दिवस नाशिकमध्ये असतील.
त्यांच्या निवासासह भोजनाची व्यवस्था हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. परंतु मुख्य उद्घाटन सोहळ्यात देशभरातील एक ते दीड लाख लोक सहभागी करून घेण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने मैदानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे सोमवारी दुपारी नाशिकमध्ये येत आहेत. त्यांच्यासोबत राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटीलही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.