Vote

नाशिक: बंद बंगल्याचा मागील दरवाजा तोडून २ लाखांचा ऐवज लंपास

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): राजीवनगर येथील बंद असलेल्या बंगल्याच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून सुमारे २ लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पंचवटीतील 'हा' वाहतूक मार्ग पुढील सहा महिने वाहतुकीस बंद राहणार; जाणून घ्या पर्यायी मार्ग…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश येवले (६९, स्नेह बंगला, राजीवनगर) हे व त्यांची पत्नी मुलाकडे पुण्याला गेले होते. गुरुवारी (दि.४) रात्री आठ वाजता घरी पती-पत्नी दोघेही परतले. घराचा मुख्य दरवाजा कुलूप उघडूनसुद्धा उघडत नव्हता म्हणून बंगल्याच्या पाठीमागे असलेल्या दरवाजाकडे जाऊन पाहिले असता दरवाजा उघडा दिसला.

🔎 हे वाचलं का?:  संत श्री निवृत्तीनाथ महाराज यात्रा: भाविकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे प्रशासनाचे आवाहन

घरात प्रवेश करून पाहिले तेव्हा सामान अस्ताव्यस्त पडले होते. मंगळसूत्र पोत, रिंग, सोन्याचे मंगळसूत्र वाटी, चार अंगठ्या, सोन्याचे पदक व रोख ५८ हजार रुपये असा एकूण सुमारे १ लाख ७२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी दरवाजा तोडून लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार इंदिरनागर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790