नाशिक: आयटीआय सिग्नलजवळ इमारतीमध्ये भीषण आग; लाखोंचे साहित्य जळून खाक

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): येथील सातपूर आयटीआय सिग्नलजवळ असलेल्या गिते स्क्वेअर या इमारतीमधील एका कार्यालयाला आज पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीने क्षणार्धात रौद्ररुप धारण केल्याने लाखो रुपयांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले…

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कोयत्याचा धाक दाखवून दहशत माजवणारी टोळी ताब्यात !

याबाबत अधिक माहिती अशी की, सातपूर आयटीआय लगत असलेल्या गिते स्क्वेअर या इमारतीत मोठ्या प्रमाणात कार्यालये आहेत.

इलेक्ट्रॉनिक वापरांच्या वस्तू या कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. या इमारतीमधील आयटी क्षेत्राशी सलग्न असलेल्या एका कार्यालयाला आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर तातडीने अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पोलिस असल्याची बतावणी करून वृद्ध महिलेचे दागिने लांबवले

यावेळी आगीचे स्वरुप भयाण असल्याने अग्निशमन पथकाने सातपूर, नवीन नाशिक, पंचवटी व मुख्यालयातील मेगा ब्राऊजर, सर्व फायर टेंडर बोलावले. त्यानंतर शर्थीच्या प्रयत्नातून आग आटोक्यात आणण्यात आली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790