नाशिक: बोधले नगर येथील युवकाच्या हत्येप्रकरणी आरोपींना अटक

नाशिक (प्रतिनिधी): उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बोधले नगर येथे काल (दि.२२ जुलै) रोजी रात्री आठ वाजता एका युवकावर धारदार शस्त्रांनी हल्ला करून खून केल्याची घटना घडली होती.

त्यानंतर आज उपनगर पोलिसांनी या खून प्रकरणी चार जणांना अटक केली असून त्यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे…

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या बोधले नगर येथे एका दुकानात कामाला असलेल्या तुषार एकनाथ चौरे या युवकावर चार जणांच्या टोळक्याने शस्त्राने वार करून त्याची हत्या केली होती. चौरे हा दुकानातील काम आटोपून आपल्या दुचाकी गाडीवर घरी जात असताना पाठीमागून दुचाकी गाडीवर आलेल्या चार जणांनी चौरे याच्या गाडीला लाथ मारली.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

त्यानंतर चौरे खाली पडल्याने या टोळक्याने चौरे याच्यावर सशस्त्र हल्ला केला. त्यावेळी या हल्ल्यात चौरे गंभीर जखमी झाल्याने मृत पावला.

दरम्यान, सदर हल्लेखोरांनी चौरे व त्याच्या जोडीदारांचा पाठलाग केला. मात्र, हल्लेखोरांच्या हातात शस्त्र असल्याने दोघेजण वेगवेगळ्या दिशेला पळाले. यानंतर सर्व हल्लेखोर चौरे यांच्या पाठीमागे धावले व त्यांनी बोधलेनगर परिसरात असलेल्या एका दुकानाजवळ चौरे यास गाठून त्याच्यावर सपासप वार करत त्याला ठार केले. या घटनेनंतर चौरे याचा मित्र सचिन गणपत गरड आणि त्याचा मित्र घटनास्थळी आला असता चौरे हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

त्यानंतर सदर घटनेची माहिती उपनगर पोलिसांना समजताच पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. याप्रकरणी सचिन गरड याने तक्रार दाखल केली असून पोलिसांनी हल्लेखोर सुलतान मुख्तार शेख, रोहित पगारे, तसेच विधी संघर्षित बालक यांना अटक केली आहे. तसेच सदरचा हल्ला हा पूर्व वैमनस्यातून झाला असल्याचे समजते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790