नाशिक: आईला दवाखान्यातून घरी आणण्यासाठी गेलेल्या मुलाचा अपघाती मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक मध्ये घडली मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे.  जिल्हा शासकीय रुग्णालयातुन आईला डिस्चार्ज घेण्यासाठी येणाऱ्या मुलाचा अपघातात मृत्यू झाला आहे. मुलाच्या निधनाचे वृत्त समजताच आईला मोठा धक्का बसला.  या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.  

नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातुन आईला डिस्चार्ज घेण्यासाठी येणाऱ्या मुलाचा अपघातात मृत्यू झाला आहे. नाशिकच्या द्वारका परिसरातील ट्रॅक्टर हाऊस येथील उड्डाणपुलावर हा अपघात झाला.  आकाश कैलास कोतकर असे मृत तरुणाचे नाव आहे.

हे ही वाचा:  नाशिक: लॅपटॉपसह दुचाकीचोर पोलिसांच्या तावडीत; क्राईम ब्रांच युनिट १ ची कारवाई !

आकाश याच्या आईवर गेल्या चार दिवसांपासून शासकीय जिल्हा रुग्णालय उपचार सुरु होते. शनिवारी त्याच्या आईला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार होता. आईला घरी घेऊन जाण्यासाठी आकाश पिंपळगाव येथून नाशिकला त्याच्या मित्रांसोबत दुचाकीवर निघाला होता.

द्वारका येथील उड्डाणपुलावर आकाशचा अपघात आला. याठिकाणी बंद कंटेनर उभा होता. आकाश याची दुचाकी उभ्या असलेल्या कंटेनरला मागच्या बाजूस जाऊन आदळली. यात दोघंही गंभीर जखमी झाले होते. दोघांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी आकाश याला मृत घोषित केल असून एक गंभीर जखमी आहे. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group