नाशिक: एमजी रोडवरील अग्नितांडवात दुकाने खाक; रविवारी (दि. १२) रात्री ११ वाजेची घटना

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात दीपावलीचा सर्वत्र जल्लोष असताना रविवार (दि. १२) रात्री ११ वाजेच्या सुमारास एमजी रोडवर लागलेल्या भीषण आगीत सुमारे ५ ते ६ दुकाने भस्मसात झाल्याची भीती व्यक्त होत आहे. उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या बंबांद्वारे शर्थीचे प्रयत्न सुरू होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकच्या ब्रँडिंगसाठी व्यापक आराखडा तयार करावा- प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

एमजी रोडवरील रेडक्रॉस सिग्नलजवळ वर्धमान शोरूमला रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास आग लागली. काही वेळेतच आगीने रौद्र स्वरूप धारण केले.

त्यामुळे लगतच्या बुक डेपो, संगीत विद्यालय यासह या भागातील अन्य ५ ते ६ दुकानांना आगीची मोठ्या प्रमाणावर झळ बसली. या घटनेत अनेक दुकानातील कोट्यावधी रुपये किमतीचे साहित्य जळून खाक झाल्याची भीती व्यक्त होत आहे. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. आग नियंत्रणात आणण्यासाठी हायड्रोलिक शिडीचा वापर करण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गंगापूर रोडवर जाहिरातींना अडसर ठरतात म्हणून ५५ झाडे तोडली; सहा जणांना अटक

अग्निशमन दलाचे १५ बंब घटनास्थळी:
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तब्बल १५ बंब घटनास्थळी तातडीने दाखल झाले. जवानांनी रात्रीच्या अंधारात अनेक अडथळे पार करत आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने बचाव कार्याला अडथळे निर्माण होत होते. दीपावलीनिमित्त फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे ही आग लागल्याची भीती व्यक्त केली जात असली तरी, त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नव्हता.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790