नाशिक (प्रतिनिधी): फायनान्स कंपनीकडून इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूच्या नावाने कर्ज मंजूर करून घेत ते कर्ज ग्राहकांना रोख स्वरूपात वाटप करून कंपनीची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दुकानदार आणि ग्राहकांच्या विरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती आणि हर्षल जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, होम क्रेडिट इंडिया फायनान्स कंपनीत नोकरी करतात. संशयित दीपाली गणेश झाल्टे, गणेश झाल्टे यांनी त्यांच्या मालकीच्या श्री साई इलेक्ट्रॉनिक्स ट्रेडिंग सेल्स अँड सर्व्हिस, तिगरानियारोड या दुकानाच्या नावाने १५ ग्राहकांना टीव्हीसाठी कर्ज दिल्याचे भासवत ७ लाख ८१ हजार रुपये मंजूर केले व ते वाटप केले. ग्राहकांनीही टीव्ही घेतल्याचे खोटे सांगत कंपनीची फसवणूक केली. कर्जाचे उर्वरित दाेन लाख ५६ हजार रुपयांचे हप्ते न भरता फसवणूक केल्याची तक्रार पोलिसांना दिली.