नाशिक: कांदा उत्पादक महिलेचा प्रामाणिकपणा; खात्यात चुकून आलेले पावणे दोन लाख रुपये केले परत !

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यातील लासलगावमध्ये कांदा उत्पादक महिलेच्या खात्यात चुकून जमा झालेले १ लाख ७६ हजार रुपये त्यांनी ज्यांच्या खात्यातून पैसे आले त्या महिलेला पुन्हा परत केले. या कृतीमुळे आजही माणुसकी आणि प्रामाणिकपणा टिकून असल्याची चर्चा नाशिक जिल्ह्यात सुरु आहे.

कांदा सडतो, कांद्याला बाजार भाव नाही त्यात कांद्याची असलेली अग्रेसर बाजारपेठ लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील 17 बाजार समित्यातील कांद्याचे लिलाव पुन्हा बेमुदत काळासाठी बंद असल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेले कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त असताना चुकून 1 लाख 76 हजार 419 रुपये आलेले कांदा उत्पादक महिला शेतकरी निर्मला भाऊसाहेब कदम यांनी श्रीमती कमल आबाजी सोनवणे यांना परत करत आपली इमानदारी दाखवल्याने या महिला शेतकरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

हे ही वाचा:  बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी तर दहावीची २१ फेब्रुवारीपासून

लासलगाव येथील आबाजी विठ्ठल सोनवणे यांचे प्रोव्हीदंड फंड व इतर मिळणारी रक्कम  नाशिक जिल्हा को-ऑपरेटिव्ह भुविकास बँकेतून लासलगाव येथील बँक ऑफ बडोदा टाकळी शाखेत श्रीमती कमल आबाजी सोनवणे यांच्या बँक खात्यात 1 लाख 76 हजार 419 रुपये जमा होणार होते. मात्र बँक खात्याचा शेवटचा एक क्रमांक चुकल्याने येवला तालुक्यातील निळखेडे येथील महिला शेतकरी निर्मला भाऊसाहेब कदम यांच्या खात्यामध्ये 1 लाख 76 हजार 419 रुपये ही रक्कम चुकून जमा झाली.

हे ही वाचा:  नाशिक: एसटी व ट्रकचा अपघात; दोन्ही चालक ठार; २ जण गंभीर जखमी

हा संपूर्ण प्रकार जून महिन्यातील असून याबाबत कांदा उत्पादक शेतकरी निर्मला कदम यांना कुठलीही माहिती नव्हती. आता साडेतीनशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे अनुदान बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाल्याने किती अनुदान आले याची माहिती घेण्यासाठी महिला शेतकरी निर्मला कदम या लासलगाव येथील बँक ऑफ बडोदा येथे गेल्या असता अचानक इतकी मोठी रक्कम आल्याने सुखद धक्का बसला. पण इतकी रक्कम आली कशी याची सखोल चौकशी केली असता ही रक्कम माझी नसल्याचे सांगत त्यांनी कोणत्या बँक खात्यातून आली आहे त्याची माहिती घेत संबंधित बँकेशी संपर्क केला.

हे ही वाचा:  नाशिक: खाजगी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक जण जखमी

भुविकास बँकेच्या व्यवस्थापक मीना किसन एखंडे यांनी तपासणी केली असता शेवटचा एक क्रमांक चुकल्यामुळे हा प्रकार घडले चे लक्षात आले. आबाजी सोनवणे यांच्या पत्नी श्रीमती कमल सोनवणे यांच्याशी संपर्क करत केदारनाथ नवले, सागर कदम, मंगेश कदम, भाऊसाहेब कदम यांच्या उपस्थितीत 1 लाख 76 हजार 419 रुपये रक्कमेचा धनादेश श्रीमती कमल आबाजी सोनवणे यांना देत रक्कम अदा केल्याने कांदा उत्पादक महिला शेतकरी निर्मला भाऊसाहेब कदम यांचे शाल श्रीफळ देऊन श्रीमती कमल सोनवणे यांच्या कुटुंबाने आभार मानले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790