नाशिक (विशेष प्रतिनिधी): आज १५ एप्रिल २०२० रोजी डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालय येथे भरती असलेला एक नागरिक covid-19 बाधित आढळून आला आहे. ही व्यक्ती ट्रक क्लिनर असुन सेक्टर-४ संदाना ,नवी मुंबई येथे कामकाज करीत होता व दिनांक 30 मार्च रोजी मुंबई पुणे मार्गाने नाशिक मध्ये आलेला होता. नाशिक मध्ये आल्या बरोबर लगेचच त्याला समाज कल्याण विभागाच्या शेल्टर होममध्ये भरती करण्यातआलेले होते. तेव्हापासून तो तेथेच राहत होता. शेल्टर होम (क्वॉरटाईन) मधून कोणालाही बाहेरजाण्याची परवानगी नाही.
सदर व्यक्तीस दिनांक 13 एप्रिल २०२० रोजी अंगदुखी व डोकेदुखी होती त्यानुसार डॉक्टरांनी तेथेच तपासणी केली होती व त्यास डॉ. जाकिर हुसेन रुग्णालय येथे भरती केले. त्याचदिवशी त्याचा covid-19 करिता स्वाब पाठवण्यात आला होता. त्याचा रिपोर्ट आज प्राप्त झाला. शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार संबंधित समाज कल्याण शेल्टर होम सील करण्यात आलेले असून त्यामधून कोणासही बाहेर जाण्याची परवानगी नाही तसेच आरोग्य कर्मचा यांशिवाय इतर कोणीही आत मध्ये जाऊ शकणार नाही. कन्टामेन्ट प्लॅननुसार या भागास सिल करण्यात आले आहे.या भागातील नागरिकांना सर्दी-खोकल्ला-ताप व दम लागणे अशा तक्रारी असल्यास आरोग्य यंत्रणेस कळवावे, तसेच सदर समाज कल्याण शेल्टर होम येथील वास्तव्य असलेले सर्व नागरिकांची covid19 करिता तपासणी करण्यात येणार आहे. याबाबतचा आदेश मनपा आयुक्त नाशिक महानगरपालिका यांनी पारित केलेला आहे. तसेच सदर ठिकाणी निर्जंतुकीकरण फवारणी केलीआहे. १० टिम तैनात केल्या आहेत. सदरहू त्या भागाचे सर्वेक्षण सुरु करणेत आले आहे.