BREAKING NEWS: नाशिकमध्ये शेल्टर होम मधून एक कोरोना पॉझिटिव्ह

नाशिकमध्ये अजून एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. समाजकल्याण येथील शेल्टर होम मध्ये काही लोकांना ठेवण्यात आले होते. त्यातील 24 वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झालेली आहे. त्यामुळे नाशिककरांनी आता जास्त काळजी घेण्याची गरज आहे. आज दि.१५ एप्रिल रोजी सकाळपासून रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरु झाली होती. या दरम्यान पोलिसांनी सुद्धा वाहनांची चौकशी करणेही बंद केले होते. हे नाशिकसाठी हितावह नक्कीच नाही. त्यामुळे नाशिककरांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान २९ मार्चला दाखल झालेला पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या नंतरच्या तिन्ही चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला कोरोनामुक्त घोषित करून रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आलंय.

Loading

हे ही वाचा:  त्र्यंबकेश्वरला भेसळयुक्त १३५ किलो मिठाई केली नष्ट; अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790