ई-पाससाठी बनावट निगेटिव्ह रिपोर्ट बनवून देणाऱ्या नाशिकच्या दोघांना अटक !

नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाबाधित नसल्याचा बनावट कोविड १९ रिपोर्ट देऊन जिल्ह्यांतर्गत प्रवासासाठी ई-पास काढून देणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ठक्कर बाजार येथील हायटेक ऑटो सोल्युशन सायबर कॅफेतून बाहेरगावी जाण्याऱ्या नागरिकांना ई-पास काढून दिला जातो. या ठिकाणी दोघे जण बनावट ग्राहक बनून गेले आणि त्यांना ई-पास साठी पैसे घेऊन बनावट निगेटिव्ह रिपोर्ट बनवून देण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  लॉकडाऊनबाबत अफवा निराधार; राज्यात इंधनाचा पुरेसा साठा – मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

याप्रकरणी चंद्रकांत मेतकर आणि राहुल कर्पे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790