नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
ठक्कर बझारचा भार होणार कमी !
नाशिक (प्रतिनिधी): मेळा बसस्थानकाला राज्यातील पहिले वातानुकूलित स्थानक करण्यात आले असून स्थानकाचे शनिवारी (दि. १०) लोकार्पण होईल. रविवारपासून पुणे, धुळे, छत्रपती संभाजीनगरसह लांब पल्ल्याच्या बसेस या स्थानकातून सुटणार असल्याचे नियोजन झाले आहे.
बसपोर्टमध्ये पोलिस चौकी, मॅनेजर केबीन, रेस्ट रूम, गेस्ट रूम, संपूर्ण बसपोर्ट वातानुकूलित
कुंभमेळ्याच्या पार्शवभूमीवर बांधलेलेले नवीन मेळा बसस्थानक हे २० प्लॅटफॉर्मचे असून येथून रोज १५०० बसेसद्वारे ६०००० प्रवाशांची ये-जा होणार आहे. या स्थानकामुळे ठक्कर बझार स्थानकावरील भार कमी होणार असून बाहेरील आणि स्थानकातीलही कोंडी फुटणार आहे. या स्थानकातून छ. संभाजीनगर, पुणे, धुळे, मालेगाव, सटाणा अशा लांब व मध्यम पल्ल्याच्या बसेस सुटणार आहेत. तर ठक्कर बझार येथून इगतपुरी, जव्हार, सिन्नर, त्र्यंबकेश्वर व ग्रामीण भागातील फेऱ्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
स्थानकातील वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न सुटणार:
नवीन बसस्थानक परिसरातील पार्किंगचा जागेमुळे या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी निर्माण होत होती. मात्र आत मेळा बसस्थानक येथून आता बसेस सोडण्याचे नियोजन के जात असल्याने या परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे.