नाशिक (प्रतिनिधी) कोरोना आजाराची लक्षणे असताना ही त्याची माहिती आरोग्य विभागापासून लपवली आणि कोरोनाचा याचा प्रादुर्भाव केल्याप्रकरणी पोलिसांनी अंबड येथील २ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसह डॉक्टर वर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबड येथील संजीव नगर भागात एका वृद्ध महिलेला गेल्या काही दिवसापूर्वी कोरोना ची लागण झाल्याचा अहवाल आला, त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या अजून एकाला कोरोना ची लागण झाली, तर यापूर्वी त्या महिलेवर परिसरातील एका शिकाऊ डॉक्टरने उपचार केले होते.
सदर डॉक्टर शिकाऊ आहे. अशावेळी या रुग्णावर स्वत: उपचार करणे चुकीचे होते. यावेळी कोरोनाची लक्षणे असतानाही शासकीय रुग्णालयात दाखल न करता स्वतः उपचार केले. याप्रकरणी डॉक्टर बस्ते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड येथील २ कोरोना रुग्णासह शिकाऊ डॉक्टर वर कोरोना रोगाच्या आजाराचा प्रसार केल्याप्रकरणी भा.द.वि कलम २६९, २७० प्रमाणे अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त मंगलसिंग सुर्यवंशी यांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी करीत आहेत.