नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): त्र्यंबकरोडवरील जिल्हाधिकारी बंगल्यालगतच्या रस्त्यावर दिवाळीच्या दिवशी पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून पोबारा करणारा पोलीस कर्मचारीच असल्याचे निष्पन्न झाले होते.
नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी संशयित योगेश शंकर लोंढे या पोलीस कर्मचाऱ्यास पोलीस सेवेतून बडतर्फ केले आहे.
लोंढे याच्यावर यापूर्वीही निलंबनाची कारवाई झालेली आहे. गेल्या वर्षभरात दोघांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलेले आहे.
चैनस्नॅचिंगचा गुन्हा दाखल असलेला योगेश लोंढे हा शहर पोलिस सेवेत शिपाई या पदावर कार्यरत होता.
सध्या त्याची पोलीस मुख्यालयात नेमणूक होती. यादरम्यानच त्याने दिवाळीच्या दिवशी अल्पवयीन मित्राच्या मदतीने पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून पोबारा केला होता. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात जबरी चोरीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
लोंढे २०१८ मध्ये मुंबई नाका पोलिस ठाण्यात नेमणुकीला असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्याला लाच घेतल्याप्रकरणी अटक केली होती. त्याला नोव्हेंबर २०१८ ते जुलै २०१९ पर्यंत निलंबितही करण्यात आले. त्यानंतर सेवेत दाखल झाल्यानंतर, २०२० मध्ये त्याच्याविरोधात सिन्नर पोलिसांत विवाहितेच्या छळाचा गुन्हा दाखल आहे.
त्यामुळे त्याला पुन्हा ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत निलंबित करण्यात आले. निलंबन काळानंतर त्याला पोलिस मुख्यालयात नेमण्यात आले होते. त्याच्या सततच्या गैरवर्तनासह गुन्हेगारी कृत्याची पोलिस आयुक्त कर्णिक यांनी गंभीर दखल घेत त्याच्यावर सेवा बडतर्फीची कारवाई केली आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790