नाशिक: चौक मंडईत 10 ते 12 वाहनांची तोडफोड; टोळक्या विरोधात गुन्हा दाखल

नाशिक (प्रतिनिधी): जुने नाशिक परिसरामध्ये शनिवारी रात्री दोन गटात झालेल्या हाणामारीत जमलेल्या जमावाने दहा ते बारा वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली.

ही घटना चौक मंडई परिसरामध्ये घडली असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात टोळक्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: १४ वर्षीय मुलीचे अपहरण करत अत्याचार करणाऱ्याला २० वर्षे सश्रम कारावास

जुने नाशिक परिसरातील चौक मंडईत शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दोन युवकांमध्ये अज्ञात करण्यातून वाद झाला. त्याचे पर्यावरण हाणामारीत झाले.

या वादाच्या घटनेमुळे गैरप्रकारची मंडळी जमा होऊन वादाचे पर्यावरण दंगल सदृश्य स्थितीमध्ये होऊन जमलेल्या जमावाने चौक मंडईत असलेल्या दहा ते बारा चारचाकी वाहने आणि चार ते पाच दुचाकी वाहनांची तोडफोड केली.

👉 हे ही वाचा:  नाशिक: फुड अ‍ॅण्ड ड्रग्स अधिकारी असल्याचे भासवून ट्रक अडवून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक !

या घटनेमुळे परिसरामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. घटनेची माहिती मिळतच भद्रकाली पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात टोळक्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन आठ ते दहा जणांना ताब्यात घेतले आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिकला पावसाचा ऑरेंज अलर्ट; राज्यात आणखी चार दिवस पावसाचे

परिसरातील तणावाची परिस्थिती पाहता पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790