नाशिक (प्रतिनिधी): मध्य रेल्वेने इंटरलॉकिंग कामासाठी मेगा ब्लॉक घेतल्यामुळे आज (दि. १) आणि ४ फेब्रुवारी रोजी नाशिक-बडनेरा व बडनेरा- नाशिक तसेच देवळाली-भुसावळ व भुसावळ- देवळाली एक्स्प्रेस या दोन गाड्या रद्द केल्या आहेत.
भुसावळ विभागातील पाचोरा येथे यार्ड रिमॉडेलिंगच्या कार्यानिमित्त प्री-नॉन इंटरलॉकिंग (फेज-टू) आणि नॉन इंटरलॉकिंग कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येत असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. त्याचप्रमाणे तीन गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या असून त्या विलंबाने सुटणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
👉 वेळ बदल केलेल्या गाड्या:
👉 मुंबई हावडा गीतांजली एक्स्प्रेस मुंबईतून दोन तास
👉 एलटीटी – अयोध्या गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दोन तास
👉 एलटीटी – गोरखपूर लोकमान्य टिळक टर्मिनस येथून एक तास उशिराने सुटेल.
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790