Breaking News: नाशिकच्या सिडकोमध्ये तरुणाचा खू’न; लागोपाठ दुसरी घटना

Breaking News: नाशिकच्या सिडकोमध्ये तरुणाचा खू’न; लागोपाठ दुसरी घटना

नाशिक (प्रतिनिधी): येथील लेखानगर चौपाटीजवळ एका तरुणाचा खू’न झाल्याच्या घटनेला महिना  उलटत नाही, तोच अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारगिल चौक भागात मंगळवारी (दि.३१) रात्री जुन्या भांडणाची कुरापत काढून एका तरुणास धा’रदा’र श’स्त्रा’ने भो’स’कू’न खू’न करण्यात आल्याच्या घटनेने परिसर हादरला.

अंबड पोलीस ठाण्याचे सूत्रे जुन्याच अधिकाऱ्यांकडे बदलीनंतर कायम ठेवण्यात आल्याने पोलीस हद्दीतील गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. सिडकोतील स्टेट बँक चौपाटीजवळ असलेल्या सोनाली मटन खानावळीसमोर गेल्या बुधवारी २८ जुलै रोजी रात्री एका तरुणाचा खू’न केल्याचा प्रकार ताजा असताना मंगळवारी पुन्हा असाच प्रकार घडला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: मुख्याध्यापिका घरी एकटीच; अचानक टोकाचा निर्णय अन् होत्याचं नव्हतं झालं…

अंबड पोलीस ठाणे हद्दीत महिनाभरात दोन खू’न झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी नऊ वाजेच्या सुमारास राहुल गवळी (२५) या तरुणास अंबड येथील कारगिल चौक परिसरात जुन्या भांडणाची कुरापत काढून संशयितांच्या टोळक्याने बे’द’म मा’र’हा’ण करून प्रा’ण’घा’त’क ह’ल्ला करत धा’र’दा’र श’स्त्रा’ने भोसकले. यात राहुल हा गं’भी’र जखमी झाल्याने या ह’ल्ल्या’त त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा:  नाशिक: पाणीपट्टी दरवाढीला अखेर स्थगिती; अतिरिक्त आयुक्तांनी केली घोषणा !

याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ह’ल्ले’खो’र नेमके कोण होते? याबाबत उशिरापर्यंत पोलिसांना सुगावा लागलेला नव्हता. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
महत्वाची बातमी: नाशिक शहरातील या भागांत शुक्रवारी (दि. ३ सप्टेंबर) पाणीपुरवठा नाही
नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. १ सप्टेंबर) इतके कोरोना रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ; इतके मृत्यू
नाशिक शहरात गुरुवारी (दि. २ सप्टेंबर) या ठिकाणी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचं मोफत लसीकरण !

हे ही वाचा:  नाशिक: आठवीच्या अपहृत विद्यार्थ्याचा खून; वडीवऱ्हे येथे आढळला मृतदेह

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790