नाशिक: सिडकोतून 437 किलो बनावट पनीरचा साठा जप्त !

नाशिक (प्रतिनिधी): अन्न व औषध प्रशासनाने छापा मारून सिडकोतून सुमारे ४३७ किलो बनावट पनीरचा साठा जप्त केला. जप्त केलेल्या भेसळ पनीरची किंमत १ लाख ४ हजार ८८० रुपये आहे.

नाशिक शहरात बनावट पनीर व भेसळयुक्त पनीर विक्री होत असल्याची गुप्त माहिती प्रशासनास मिळाली असता, ही कारवाई करण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ‘उल्लास नवभारत साक्षरता अभियान’ अंतर्गत जिल्ह्यात फ्लॅन्ट परीक्षेचे आज (दि. २९) आयोजन

सिडकोतील महाकाली चौकातील साईबाबानगर येथील आशीर्वाद डेअरीच्या पेटीची तपासणी केली असता पेटीत अत्यंत अस्वच्छ वातावरणात पनीरचा साठा साठवल्याचे निदर्शनास आले.

सदर पनीरचा भेसळीच्या संशयावरून विश्लेषणासाठी घेउन उर्वरित ४३७ किलो पनीरचा साठा जप्त करण्यात आला. सदर साठ्याची मुदत २० जुलैला असल्याने जागेवर नष्ट करण्यात आला आहे, अशी माहिती अन्न व सुरक्षा विभागाने दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर मनपाची तयारी; तीन रुग्णालयांत २० खाटा राखीव

सदर मोहिमेत अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले असून, विश्लेषण अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा व मानक कायदा २००६ अन्वये पुढील कारवाई घेण्यात येईल. सदर मोहीम ही यापुढेही सुरू राहणार आहे.

तरी अन्न व्यावसायिकांनी अन्नपदार्थात भेसळ करू नये. भेसळ करताना आढळून आल्यास संबंधितावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा विभागाकडून देण्यात आला आहे. अन्न व औषधांच्या दर्जाबाबत संशय असल्यास टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क करावा.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कोयत्याचा धाक दाखवून दहशत माजवणारी टोळी ताब्यात !

तसेच नागरीकांनी तसेच हॉटेल व्यावसायिकांना स्वस्त, बिनाबिलाद्वारे विक्री करण्यात येणारे पनीर विकत घेऊ नये, असे आवाहन केले आहे.

सदर कार्यवाही सहआयुक्त संजय नारगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली एस. पाटील व अविनाश दामा, सहाय्यक आयुक्त (अन्न) मनीष सानप आदींनी केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790