नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
खुनाच्या घटनेने पंचवटी पुन्हा हादरले दिंडोरी नाका येथील सायंकाळची घटना
नाशिक (प्रतिनिधी): पेठरोड परिसरातील शनि मंदिर येथील रहिवासी किरण गुंजाळ (वय २७) याची दिंडोरी रोडवरील अभिषेक स्वीट्ससमोर सायंकाळी भर रस्त्यात धारधार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.
मयत हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे समजते. सन २०१८ साली किरण गुंजाळ याच्या लहान भावाचा देखील खून करण्यात आला होता, असे समजते.

मृत किरण गुंजाळ हा कृषी उत्पन्न बाजार समितीत मिरची विक्रीचा व्यवसाय करत होता. तर पेठ रोडवरील शनी मंदिर, नवनाथ नगर येथील रहिवासी असल्याची समजते.
३ ते ४ जणांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे.. या हल्लेखोरांच्या मागावर पोलीसांनी जवळपास ५ ते ७ किमी पाठलाग केला असून परिसरातील सीसीटीव्ही तपासणीचे काम सुरू आहे.
- नाशिकरोडला अकाऊंटंटसोबत संगनमत करून पेट्रोल पंपचालकास 72 लाखांचा गंडा
- नाशिकच्या ८७ वर्षीय कुलकर्णी आजींनी त्यांच्या वाढदिवशी सैनिकांना दिली तब्बल ५ लाखांची भेट !
यावेळी पोलीस उपायुक्त डॉ किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त गंगाधर सोनवणे, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिताराम कोल्हे, गुन्हे शाखेचे विजय ढमाळ, अधिक तपासासाठी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. मारेकऱ्यांच्या तपासासाठी पथके रवाना करण्यात आल्याचे समजते. पुढील तपास पंचवटी पोलिस करीत आहे.