नाशिक: रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यास अटक

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): रेल्वेची आरक्षित ई-तिकीटे आपल्या लॅपटॉप आणि मोबाईलवरून प्रवाशांना त्यांच्या वैयक्तिक वापरकर्ता आयडीमधून काढून विकणाऱ्याला नाशिक रोड रेल्वे सुरक्षा बलाने अंबड पोलिसांच्या मदतीने अटक केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शासनमान्य ग्रंथ यादी निवडीकरिता प्रकाशित ग्रंथ 28 फेब्रुवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन

राहुल रघुबीरप्रसाद सिंग (रा. अंबड) असे या संशयिताचे नाव आहे.

तिकिटांच्या मोबदल्यात संशयित राहूल हा प्रवाशांकडून शंभर रुपये अतिरिक्त घेत होता. ऑपरेशन उपलब्ध अंतर्गत रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक हरफूलसिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सह उपनिरीक्षक एन. के. राघव, मनोज कांबळे, किशोर चौधरी यांनी अंबड पोलिस ठाण्याच्या मदतीने ही कारवाई केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: डा‍क विभागाची 2 फेब्रुवारीला पेन्शन अदालत; निवृत्तीवेतनधारकांनी 28 जानेवारीपर्यंत करावेत अर्ज

राहुल सिंग हा अंबड एमआयडीसीमध्ये वेल्डर म्हणून काम करतो. अधिक पैसे कमवायच्या लालसेपोटी आयआरसीटीसीच्या वेगवेगळ्या वैयक्तिक आयडीवरून रेल्वे आरक्षित ई-तिकीट काढून गरजू प्रवाशांना आणि त्याच्या ओळखीच्या लोकांना शंभर रुपये कमिशन घेऊन ते विकत असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.

राहुल सिंगचा लॅपटॉप व मोबाईल उघडल्यानंतर १५ वैयक्तिक युजर आयडी ॲक्टिव्ह तर ४३ आयडी बंद आढळले. त्याच्या जवळून १४ रेल्वे आरक्षण ई-तिकीट, पाच जुने आरक्षण ई-तिकीट जप्त करण्यात आली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790