नाशिक: गाडीवरील ताबा सुटला अन युवतीसह गाडी थेट एटीएममध्ये… Video बघा…

नाशिक: गाडीवरील ताबा सुटला अन युवतीसह गाडी थेट एटीएममध्ये… Video

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमध्ये अपघाताच्या घटना सातत्याने घडत आहेत.

मात्र आज नाशिकच्या सावतानगरमध्ये विचित्र अपघात समोर आला आहे.

पार्क केलेली गाडी काढतांना तरुणी गाडीसह थेट एटीएममध्ये शिरल्याची घटना घडली आहे.

नाशिकच्या सावतानगर परिसरात पैसे काढण्यासाठी आलेली तरुण दुचाकीसह थेट एटीएममध्ये घुसल्याने एकच खळबळ उडाली.

सावतानगरच्या एसबीआय बॅकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरूणीचा दुचाकी गाडीवरील ताबा सुटल्याने तीची ही गाडी थेट एटीएममध्ये घुसली व सर्वांचा गोंधळ उडाला. सावतानगर परिसरातील महालक्ष्मी चौक मंदिरासमोर असलेले एसबीआय बॅकेच्या एटीएममध्ये ही घटना घडली.

हे ही वाचा:  नाशिक: रथसप्तमीनिमित्त रामकुंडावरील सूर्यमंदिर आज भाविकांसाठी खुले

सदर तरुणींकडून चुकून गाडीचा रेस जोरात झाल्याने गाडीसह युवती एटीएमचा दरवाजा तोडून एटीएमवर धडकली. या अपघातात तरूणीच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. तरुणीस प्राथमिक उपचारासाठी जवळच्याच एका दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. विशेष ही घटना एटीएम शेजारी असलेल्या एका दुकानाच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. गौरी प्रदीप सैदाने (18)  खांडे मळा, सावता नगर, सिडको असे मुलीचे नाव आहे. गौरी ही सकाळच्या सुमारास घरातून ताक घेण्यासाठी आली होती. यावेळेस गाडी वरचा ताबा सुटल्याने ही घटना घडली. सुदैवाने मोठी हानी टळली असली तरी गाडीच मात्र मोठं नुकसान झालं आहे.

हे ही वाचा:  महाराष्ट्र कृषि-उद्योग विकास महामंडळाने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अधिक सक्षम करावा - कृषीमंत्री ॲड. कोकाटे

सीसीटिव्हीमध्ये घटना कैद: सदर तरुणी एटीएमच्या समोर दुचाकी लावण्याचा प्रयत्न करते आहे. अशावेळी ती कधी मागे तर पुढे जात आहे. तर एकदा फुटपाथवरून उतरून थेट मागे जाते. मात्र मागे जाऊन ती इतक्या स्पीड ने जाते कि एटीएमचा दरवाजा चक्काचूर झालेला सीसीटीव्हीत पाहायला मिळतो. तर स्पीड मध्ये येत असताना एक आजोबा थोडक्यात बचावल्याचे दृश्यात दिसते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790