नाशिक (प्रतिनिधी: कोविड- 19 या विषाणूचा प्रादुर्भाव नाशिक जिल्ह्यात वाढत असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस मात्र 24 तास आपले कर्तव्य बजावत आहे. या पोलीसांसाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या सुचनेनुसार मेट भुजबळ नॉलेज सिटीचे संचालक नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या विद्यार्थी वसतिगृहाचे रुपांतर पोलीस विलगीकरण कक्षात केले आहे. याठिकाणी जवळपास 75 फ्लॅटची व्यवस्था करण्यात आली असून सुमारे 350 पोलिस व त्यांच्या कुटुंबियांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
आडगाव स्थित मेट भुजबळ नॉलेज सिटी कॉलेज जवळच नाशिक ग्रामीण पोलिसांचे मुख्यालय आहे. त्यामुळे नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधिक्षक डॉ.आरती सिंह व पोलीस उपअधीक्षक शामकुमार निपुंगे यांनी लॉकडाऊनच्या काळात आपले कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांची नियमित तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्याने विलगीकरण कक्षात ठेवण्याची व्यवस्था व्हावी यासाठी मेट भुजबळ नॉलेज सिटीचे वसतिगृह उपलब्ध व्हावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर तात्काळ राज्याचे अन्न,नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या सुचनेनुसार मेट भुजबळ नॉलेज सिटीचे संचालक नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या विद्यार्थी वसतिगृहात पोलीस विलगीकरण कक्षासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देत याठिकाणी 75 फ्लॅटची व्यवस्था करून देण्यात आली आहे.
कोरोनाच्या कालावधीत मेट भुजबळ नॉलेज सिटीचे विद्यार्थी व संचालकाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चोवीस तास सेवा बजावत असणाऱ्या पोलिसांच्या मदतीसाठी मेट भुजबळ नॉलेज सिटीचे संचालक, व्यवस्थापक व कर्मचारी पुढे सरसावले असून नाशिक ग्रामीण पोलिसांच्या वतीने मागणी करण्यात आल्यानंतर तात्काळ विलगीकरण कक्षासाठी विद्यार्थी वसतिगृहातील 75 फ्लॅटची व्यवस्था करून देण्यात आली असून याठिकाणी 350 पोलीस कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या वसतीगृहात पोलिसांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे.